•  पाच जण ताब्यात ; ५,४८० रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त 

बेळगाव / प्रतिनिधी

शहरातील अवैध जुगार व्यवसायाला आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी सोमवारी दोन ठिकाणी छापे घालत एकूण पाच जणांना ताब्यात घेतले. या संयुक्त कारवाईत एकूण रु. ५,४८० रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मार्केट पोलीस स्थानकाचे पीएसआय शशिकुमार कुरळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जुन्या भाजी मार्केट परिसरात सुरू असलेल्या मटका व्यवहारावर छापा टाकला. यावेळी सादिक हाकीम काझी, यमनप्पा शिवबसप्पा कुरुबर आणि पंकज मोहन जाधव या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ₹३,४५० रोख व मटकाशी संबंधित सामग्री जप्त करण्यात आली. प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

त्याचप्रमाणे, कॅम्प पोलीस स्थानकाचे एएसआय टी. व्ही. करोशी व पथकाने कॅम्प परिसरात पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर कारवाई केली. येथे अक्षय आप्पा भोसले आणि अफजल अक्तर अत्ती यांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यादरम्यान एक आरोपी मात्र फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. येथून ₹२,०३० रोख आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही संयुक्त कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.