बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथील बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची शुक्रवारी रात्री आठ वाजता श्रींच्या मंडपात पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांच्याहस्ते विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” बेळगावचा राजाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, गणेशोत्सव हा युवकांना व नागरिकांसाठी एकात्मतेचा, भक्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरत असून या गणेशोत्सवात शांततेचे वातावरण व उत्साही आहे. आपण सर्वांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे परंतु आपण प्रशासनाच्या सुद्धा नियमांचे पालन देखील केले पाहिजे, जे खूप महत्वाचे आहे.”

यावेळी सुनिल यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून चव्हाट गल्लीतील श्रीच्या मंडपात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

याप्रसंगी प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, सुनिल जाधव, दिंगबर पवार, प्रजवल पाटील, प्रवीण धामनेकर, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, विनायक पवार अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, भरत काळगे, अनंत बामणे, रोहन जाध,व सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव ,संदीप कामुले, राहुल जाधव ,संजय रेडेकर, उमेश मेणसें यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.