विजयपूर / दिपक शिंत्रे
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. विजयपूर तालुक्यातील उत्नाळ गावात विजयपूर ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. द्यामण्ण भीमप्प किरु (वय ३१ रा.उत्नाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण मंगळवारी पोहण्यासाठी तलावात उतरला असता, पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सलग दोन तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.








