बेळगाव / प्रतिनिधी

पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि परिवाराने घरगुती गणेशोत्सवाची इको फ्रेंडली आगळीवेगळी परंपरा राखली आहे. शाडूच्या मातीची पर्यावरण पूरक मूर्ती, घरातील छोट्या छोट्या वस्तूंपासून सजावट तसेच ज्यादा विद्युत रोषणाईला फाटा देत काकतीकर परिवार प्रत्येक वर्षी आपला गणेशोत्सव साजरा करत असतात.

या वर्षीही काकतीकर परिवाराने आपल्या भारतनगर तिसरी गल्ली शहापूर येथील निवासस्थानी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे.बाळ गणेश शिवभक्त रूपातील श्री गणेशाची सुबक मूर्ती यांसह, प्राचीन मंदिर स्वरूपात आकर्षक सजावट केली आहे. या सजावटीसाठी घरातील जाड कागद तसेच अन्य घरगुती साहित्यातून आकर्षक सजावट केली आहे. त्याचबरोबर प्रथेनुसार घरातील गौरीची सजावट ही चित्तवेधक झालेली आहे. सौ शितल काकतीकर, श्री कौस्तुभ काकतीकर, श्रीपाद काकतीकर, सारिका काकतीकर, वैष्णवी काकतीकर यांनी आपल्या कल्पकतेनुसार देखावा बनविला आहे. गौरी मातेची सजावट सौ रेणू काकतीकर यांनी केली आहे. गौरी गणेशाची आकर्षक सजावट पाण्यासाठी गणेश भक्तांचे काकतीकर परिवाराच्या घरी गर्दी होत आहे.