• राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २३ पदके व २ वैयक्तिक चॅम्पियनशिप ट्रॉफींची कमाई

बेळगाव /  प्रतिनिधी

गोव्यात २० व २१ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पॅशनेट स्पोर्ट्स अकादमी (PSA) च्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करत तब्बल २३ पदके आणि २ वैयक्तिक चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावल्या. या यशामुळे अकादमीसह बेळगावच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

  • वैयक्तिक चॅम्पियनशिप विजेते : 
  • निराली हिंगमिरे – वैयक्तिक चॅम्पियनशिप
  • २५ मी. फ्रीस्टाईल – कांस्य 🥉
  • २५ मी. बॅकस्ट्रोक – रौप्य 🥈
  • २५ मी. किकबोर्ड – सुवर्ण 🥇
  • सृष्टी कांग्रळकर – वैयक्तिक चॅम्पियनशिप
  • १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक – सुवर्ण 🥇
  • १०० मी. आयएम – सुवर्ण 🥇
  • ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक – सुवर्ण 🥇
  • ५० मी. फ्रीस्टाईल – सुवर्ण 🥇
  • ५० मी. बटरफ्लाय – सुवर्ण 🥇
  • इतर जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी
  • साद खाझी :
  • ५० मी. फ्रीस्टाईल – रौप्य 🥈
  • ५० मी. बटरफ्लाय – रौप्य 🥈
  • ५० मी. बॅकस्ट्रोक – रौप्य 🥈
  • यश के. पाटुकाळे :
  • २५ मी. बॅकस्ट्रोक – सुवर्ण 🥇
  • २५ मी. फ्रीस्टाईल – रौप्य 🥈
  • २५ मी. किकबोर्ड – रौप्य 🥈
  • ओम के. पाटुकाळे :
  • ५० मी. बटरफ्लाय – रौप्य 🥈
  • ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक – कांस्य 🥉
  • रित्वी कंग्राळकर: 
  • ५० मी. बॅकस्ट्रोक – कांस्य 🥉
  • सम्राट मलाई : 
  • २५ मी. फ्रीस्टाईल – कांस्य 🥉
  • २५ मी. किकबोर्ड – कांस्य 🥉
  • सिद्धार्थ कुरुंदवाड :
  • १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक – सुवर्ण 🥇
  • ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक – रौप्य 🥈
  • १०० मी. फ्रीस्टाईल – कांस्य 🥉
  • १०० मी. आयएम – कांस्य 🥉

या यशामागे जलतरणपटूंचे सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. एनआयएस प्रशिक्षक शामसुंदर मारुतीराव मलाई, तसेच प्रशिक्षक मनोज जाधव, प्रशांत पाटील, सूरज मंगनाकर व अमित चव्हाण पाटील यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रभाकर कोरे आणि डॉ. प्रीती कोरे दोडवाड यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे खेळाडूंना आत्मविश्वास मिळाल्याचे अकादमीच्या वतीने सांगण्यात आले.

पदक न मिळवता देखील जिद्दीने स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व जलतरणपटूंनाही प्रशिक्षक व व्यवस्थापनाने विशेष दाद दिली आहे. ही कामगिरी आगामी स्पर्धांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे.