बेळगाव / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मार्फत गणपतीची महाआरती ही परंपरा जपत बेळगावचा राजा चव्हाट गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विद्यार्थी मार्फत पूजा विधी पार पाडला. यावेळी ताल-वाद्यांच्या मंगलमय तालावर आरती करत पवित्र असे वातावरण निर्माण करण्यात मंडळाने यश मिळविले.

याप्रसंगी जीएसटीचे अधिकारी शिवा पाटील, मराठा मंडळ संस्थेचे संचालक रामचंद्र मोदगेकर, सकल मराठा समाज्याचे समन्वयक गुणवंत पाटील, बेळगाव रुरल सोसायटी संचालक किसन रेडेकर, रमेश मोदगेकर, समाजसेवक राजू तुडयेकर, अजिंक्य पाटील, बीएससी मॅनेजर अमजद जमादार, इराणासर उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत पाटील यांनी गणपती विद्येच्या देवते बरोबर चौष्ट कलांचाही अधिष्ठाता आहे. माणसाला निरामय जगायचं असेल तर त्याला ज्ञाना बरोबरच छंद म्हणून एखाद्यी कला अवगत असायला पाहिजे. यानंतर बीएससी मॅनेजर अमजद जमादार यांनी मणांसाचा उद्देश चांगला असेल तर त्याला देवाचीही साथ लाभते आपण आयुष्यात चांगलं माणूस बनण्याचे प्रयत्न केला पाहिजे.

रामचंद्र मोदगेकर यांनी बोलताना सांगितले, निलजी गाव व चव्हाट गल्लीचे ऋणाबंध खूप जुनी आहेत. आजच्या प्रसंगी त्याचीही उजळणी होत आहे. याप्रसंगी प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनिल जाधव, विनायक पवार, निखिल गुंडकल, निशा कुडे, अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, भरत काळगे, अनंत बामणे, रोहन जाधव, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, सौरभ बामणे, संजय रेडेकर, उमेश मेणसें यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.