बेळगाव / प्रतिनिधी

दीपावली पाडव्या निमित्त गवळी बांधवांचा हा दिवस फार उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरामधून म्हशी पळवण्याचा सोहळा रंगला होता. विविध गवळी बांधव शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार जनावरांना सजवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. काही प्रमुख गल्ल्यांमध्ये म्हशी पळवून हा पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषतः गवळी बांधवांनी शहराच्या मध्यवर्ती भागात चव्हाट गल्ली येथे आयोजित केलेली शर्यत बघण्यासाठी युवावर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.