बेळगाव : ओल्ड पीबी रोडवरील ओमनगरच्या वळणावर सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती थोडक्यात बचावल्याची घटना घडली.
जुने बेळगावकडून येणारी टिप्पर ओमनगरकडे वळत असताना हा अपघात झाला. समोरून येणारी दुचाकी टिप्परच्या मागील चाकाखाली अडकली.
मात्र, सुदैवाने दुचाकीस्वार युवती बाजूला पडल्याने तिचा जीव वाचला, तर दुचाकी चाकाखाली आली. अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. केवळ दैव बलवत्तर असल्याने युवती या अपघातातून सुखरूप बचावली.








