पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठे बहुमत मिळाले असून २४३ जागांपैकी २०२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. अखेर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वाधिक १० वेळा मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जदयूने प्रत्येकी १०२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी भाजपने ८९ तर जदयूने ८५ जागांवर विजय मिळवला. तर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला १९ जागा जिंकता आल्याने एनडीए आघाडीला २०२ जागांसह मोठे बहुमत मिळाले. त्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले. या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
- नितीशकुमार यांच्यासोबत शपथ घेतलेले मंत्री :
- सम्राट चौधरी – उपमुख्यमंत्री
- विजय कुमार सिन्हा – उपमुख्यमंत्री
- मंगल पांडे
- डॉ. दिलीप जयस्वाल
- नितीन नबीन
- रामकृपाल यादव
- संजय सिंग ‘टायगर
- अरुण शंकर प्रसाद
- सुरेंद्र मेहता
- नारायण प्रसाद
- राम निषाद
- लखेंद्र पासवान
- श्रेयसी सिंग
- डॉ. प्रमोदकुमार चंद्रवंशी (आमदार)








