- सुदैवाने दुचाकीस्वार बचावला ; दुचाकीचे मोठे नुकसान
- उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीत गोंधळ
निपाणी / प्रतिनिधी
निपाणीमध्ये पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामादरम्यान ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीचे पुढचे भाग पूर्णपणे चक्काचूर झाले, मात्र दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात गांधी रुग्णालयाजवळ झाला. उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीची अवस्था बिकट झाली, परंतु दुचाकीस्वार सुरक्षित राहिला. दुचाकीस्वाराचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
गेल्या महिनाभरापासून या मार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे छोटे-मोठे अपघात सातत्याने होतात. अपघातानंतर काही वेळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.








