नवरात्री २०२५ : नवरात्रातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार ज्योतिषानी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. त्यानुसार भारतीय महिला साडी परिधान करतात व देवीला ही त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.
- मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ ; नववी माळ
- आजचा रंग : गुलाबी
- रंगाचे महत्व : गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. याचसोबत हा आपलेपणा विश्वास देखील दर्शवत असतो. गुलाबी रंग हा आनंद , जिव्हाळा, निरागसता आणि नम्रपणा दर्शवतो. असे म्हटले जाते की, लहान मुले जशी निरागस असतात तशीच आपल्यावर प्रेम करणारी माणसे निरागस असतात. त्यामुळे मैत्रीसाठी किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब दिले जाते.