नवरात्री २०२५ : नवरात्री प्रत्येक दिवशी ठराविक रंगाचे कपडे घातल्यास दुर्गा देवी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते अशी धार्मिक मान्यता आहे. खरेतर देवीची विविध रूपे लक्षात घेऊन वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
- रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ : सातवी माळ
- आजचा रंग : नारंगी (केशरी,भगवा)
- रंगाचे महत्व : नारंगी रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट यांचे प्रतिक मानला जातो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असल्यामुळे नारंगी रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे असे मानले जाते. हा रंगाशी पावित्र्यही जोडलेला आहे.