नवरात्री २०२५ : भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व आहे, त्यामुळेच रंगांचा उत्सवही आपल्याकडे साजरा केला जातो, नवरात्रीचे नऊ रंग हे याच एकात्मकतेचे प्रतीक आहेत.

हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग नवरात्र कोणत्या दिवसापासून सुरू होते यावर आधारित असतो.

दरम्यान यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे.

  • सोमवार २२ सप्टेंबर २०२५ : पहिली माळ
  • आजचा रंग : पांढरा
  • रंगाचे महत्त्व : पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.