बेळगाव : हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र (लेले) मैदान येथे शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या शारिरीक शिक्षण अधिकारी श्रीमती जे बी पटेल, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.

हॉकी बेळगाव संस्थेला बेळगाव गट शारिरीक शिक्षण अधिकारी जे बी पटेल यांनी हॉकी स्पर्धा आयोजित करण्याचे पत्र दिले आहे. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, विकास कलघटगी, एच व्ही रुगी, काकतीकर, प्रेमकुमार, चिदानंद असोदे, बापुल काळोजी आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा युवजन अधिकारी बी श्रीनिवास यांचेशीही कार्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आयोजनाची चर्चा करण्यात आली. यावेळी बेळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या हॉकी स्पर्धा दिवसभर शुक्रवार दि २९ रोजी लेले मैदान येथे घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला आहे. विजेत्या संघांना चषक व सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.