बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील खाऊकट्टा प्रकरणासंदर्भात महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आत्ता पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. सरकारच्यावतीने ॲड. जनरल हे या सुनावणीला उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित राहिल्याने सदर सुनावणी ४ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव प्रादेशिक आयुक्त, महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना आणखीन एक नोटीस बजावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.