- पत्नीच्या हत्येचाही कट : दोघांना अटक
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील शहाबंदर येथे अनैतिक संबंधातून तरुणाचा खून करणारा आणि त्यानंतर स्वतःच्या पत्नीचीही हत्या करण्याचा कट रचणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, शहाबंदर येथील महंतेश बुकनट्टी (वय २४) याचा बसमधून घरी जाताना खून झाला होता. तपासा दरम्यान पोलिसांनी प्रथम महांतेशचा चुलतभाऊ विठ्ठल बुकनट्टी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने खुनात सहभागाची कबुली दिल्यानंतर पुढील तपासात बसवराज बुकनट्टी याचे नाव समोर आले.
बसवराजला अटक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याने आपल्या पत्नीचा खून करण्याचीही योजना आखल्याचे उघड झाले. यमकनमर्डी व चिकोडी पोलिसांनी तातडीने कारवाईत करून चिकोडी येथील एका लॉजमधून दारूच्या नशेत असलेल्या बसवराजला अटक केली.
या प्रकरणात बसवराज आणि विठ्ठल बुकनट्टी या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.