बेळगाव : येळ्ळूर केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा सुळगा (ये.) येथे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये झाली. पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी या दोन्ही गटांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेतील दोन्ही गटातील विजय स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे,
- पहिली ते चौथी लहान गट
- मराठी कंठपाठ – राधिका शंकर पेडणेकर (प्रथम)
- धार्मिक पठण – निधी सूर्यकांत देसाई (प्रथम)
- भक्तीगीत- शिवण्या सागर मुचंडी (प्रथम)
- देशभक्तीगीत – आरुषी अजित चौगुले (द्वितीय)
- कथाकथन – सानवी रवी पत्तार (द्वितीय)
- मातकाम – स्मितेश चांगदेव मुरकुटे (द्वितीय)
- वेशभूषा – तृप्ती सुनील मुतगेकर (तृतीय)
- चित्रकला – आयुशी एकनाथ धामणेकर (तृतीय)
- आशुभाषण – मनस्वी मधुकर नांदुरकर (तृतीय)
- पाचवी ते सातवी गट
- मराठी कंठपाठ – श्रीशा नारायण घाडी (प्रथम)
- निबंध लेखन – पूर्वी रमेश घाडी (प्रथम)
- मातकाम – जयेश रवींद्र गुरव (प्रथम)
- मिमिक्री – ओम लक्ष्मण कुंडेकर (प्रथम)
- देशभक्तीगीत- वैष्णवी शिवाजी कणबरकर (प्रथम)
- आशुभाषण – पूर्वी रमेश घाडी (प्रथम)
- भक्तीगीत – साई नामदेव धामणेकर (प्रथम)
- धार्मिक पठण -सुशांत संदीप घाडी (द्वितीय)
- कवनवाचन – स्वरांजली सुधीर मानकोजी (द्वितीय)
- चित्रकला – साईनाथ आनंद पाटील (द्वितीय)
- कन्नड कंठपाठ – आराध्या मनोज कानशिडे (तृतीय)
- कथाकथन – वैष्णवी अशोक काकतकर (तृतीय)
- इंग्लिश कंठपाठ – रचना मोहन धामणेकर (तृतीय)
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.








