बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या गँगवाडी परिसरात गुरुवारी घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे घरातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही रहिवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.