येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील रायगड येथे निघणार्‍या मराठी सन्मान यात्रे त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते आणि भजनी मंडळ सहभागी होणार असून यासाठी लक्ष्मी गल्लीतील दत्त मंदिर येथे मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रारंभी महाराष्ट्र चौक येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. वामनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवहिंद को-ऑप. सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर आणि इंजिनिअर हणमंत कुगजी, प्रशांत मजुकर यांच्याहस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आहे.

युवानेते शुभम शेळके यांनी येळ्ळूर गाव नेहमीच सीमालढ्याचा अग्रेसर भाग राहिला असून आजही शेकडो कार्यकर्त्यांनी या मराठी सन्मान यात्रेत सहभाग दर्शवून आपली सीमाप्रश्नी निष्ठा दाखवून दिली आहे, जो विश्वास येळ्ळूर गावाने आमच्यावर दाखवला आहे त्याला तडा न जाऊ देता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करेन,असे संबोधले.

या बैठकीत दुद्दापा बागेवाडी यांनी मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देत सीमाप्रश्नी युवकांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग दर्शवून चळवळ बळकट करून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असावे, तर प्रकाश अष्टेकर यांनी ज्या प्रमाणे येळ्ळूर गावाने सीमालढ्यात अविरतपणे सहभाग दर्शवला आहे, त्याच प्रमाणे युवा वर्गाच्या पाठीशीही येळ्ळूर गाव सक्रिय सहभाग दर्शविल असे सांगितले.

खानापूर युवासमितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग सतत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आणि चळवळ सीमाप्रश्न सुटतोवर तेवत ठेवील असे आश्वासन देत देणगीदारांचे आभार मानले,अमोल जाधव, गणेश अष्टेकर, श्रीकांत नांदूरकर, आदिनी आपले विचार व्यक्त केले.
तर मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन, हिंदवी स्वराज्य युवा संघटना, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ, छत्रपती विराट गड संवर्धन पथक,
छत्रपती विराट हलगी पथक, शेतकरी कामगार गणेशोत्सव,कलमेश्वर गल्ली, शिवसेना विराट गल्ली, गावातील सार्वजनिक गणेशोत्सव, मंडळ आणि दुर्गामाता मंडळ, उषा नारायण फाउंडेशन यांनी पाठिंबा जाहीर केला.

सेच या उपक्रमाला मराठी सन्मान यात्रेसाठी नितेश फकिरा काकतकर रु. 25000/-, श्रीकांत शिवाजी नांदुरकर रु. 10000/-, (दोन क्विंटल तांदूळ) सुनील वामनराव पाटील ,रु.10000/- हणमंत लु. कुगजी, रु. 5051/- अमित य. पाटील, रु. 5000/- परशराम निंगापा धामणेकर ,रु. 5000/- बाळासाहेब पावले, रु. 5000/- हिंदवी स्वराज्य संघटना , रु. 5000/- प्रभाकर मंगणाईक,  रु. 2500/- कलमेश्वर गल्ली कामगार संघटना कलमेश्वर गल्लीच्या वतीने देणगी रु., श्री. चांगळेश्वरी शिक्षण मंडळचे प्रसाद यल्लोजी मजुकर 20 बाॅक्स पाण्याच्या बाॅटल देणगी दिली. त्याचबरोबर मिलिंद अष्टेकर, महेश कुगजी, ऋषी मजुकर, प्रवीण मजुकर वैद्यकीय कीट दिले.

यावेळी उदय जाधव, राजू पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल, अनिल हुंदरे, गोविंद बापूसाहेब पाटील, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू चौगुले, यल्लापा पाटील, सतीश देसुरकर, मनोज कुगजी,विनोद लोहार,संकल्प जाधव,सागर नायकोजी,ओमकार पाटील,सुमंत कुगजी,योगेश कदम,राहुल कुगजी,प्रविण मुचंडी, भावू हलगेकर,किरण उडकेकर,गजानन कुंडेकर,अवधूत लोहार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवा नेते दत्ता उघाडे यांनी केले तर आभार मांडले.