बेळगाव : समस्त सीमाभागात मराठी भाषेचा सन्मान आणि अस्मिता अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभाग यांच्या वतीने येत्या २६ जानेवारी रोजी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने मराठी सन्मान यात्रेची भव्य सुरुवात करण्यात येणार आहे.
या मराठी सन्मान यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी तसेच यात्रेसाठी कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य, सूचना किंवा मार्गदर्शन देऊ इच्छिणाऱ्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २१ जानेवारीपूर्वी आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे. संपर्कासाठी १) मनोहर हुंदरे – ९९४५३४६६४० २) धनंजय पाटील – ७८९९०९४१०८ ३) नारायण मुचंडीकर – ९७४१२८९८०६ ४) सचिन दळवी – ९६८६३१४८३९
मराठी भाषेचा गौरव आणि हक्कासाठी ही यात्रा महत्त्वाची असून, अधिकाधिक मराठीप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.









