बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या ‘मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे ‘जे.एस.एस.के.’ संस्थेतर्फे आयोजित ‘ओपन नॅशनल कराटे’ स्पर्धेत देशभरातील ६०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, नेपाळ, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांच्या संघांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत, बेकिनकेरे आणि अगसगा भागातील कराटेपटूंनी विशेष यश मिळवले. सुमित पुंडलिक खादरवाडकर, विनायक शिवाजी येळ्ळूरकर, सत्यम मोहन पवार, सुमित परसराम गावडे, आदित्य कृष्णा सातेरी, संदेश संतोष मोरे, सुदर्शन कल्लाप्पा लट्टी आणि कार्तिक आपया बगनाळ या सर्व खेळाडूंनी पदके जिंकून बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या या यशाबद्दल ॲकॅडमीचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.