• खडेबाजार पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हेरॉईन विक्री करणाऱ्या एकाला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. राजेसाब मुजावर (वय २१ रा. शिवाजीनगर, बेळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १९,०००/- रुपयांचे २१.६३ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत तांगडी गल्ली येथील रेल्वे ट्रॅकजवळ सार्वजनिक ठिकाणी ड्रग्ज विकताना पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.