सुळगा (हिं.) / वार्ताहर

खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ.अंजलीताई निंबाळकर यांनी गणेशोत्सवानिमित्त रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते सुनील आवडण यांच्या सुळगा (हिं.) येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. आवडण कुटुंबियांनी केलेल्या स्वागताचा त्यांनी विनम्रपणे स्वीकार केला आणि शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अंजलीताईंनी आवडण कुटुंबियांशी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री. आर. एम. चौगुले आणि इतर सहकारी उपस्थित होते.