• नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रक जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

महाशिवरात्रीच्या दिवशी मांसविक्रीवर बंदी असताना प्राण्यांच्या हाडांची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक बेळगावमध्ये पकडण्यात आला. मध्यवर्ती चन्नम्मा सर्कल येथे दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. महाशिवरात्रीनिमित्त शहरात मांस दुकाने बंद असतानाही हाडांची वाहतूक सुरू असल्याचे समोर आले.

स्थानिकांनी ट्रक अडविल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ट्रक जप्त केला. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.