बेळगाव / प्रतिनिधी
कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा निघाला. त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोक प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने रविवार दि. २० रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली जाणार आहे. दुपारी ठीक २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथून गोकाकला कार्यकर्ते निघणार आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी युवा समिती सीमाभागच्या पदाधिकायांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.