बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा निघाला त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नडसक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोक प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने उद्या रविवार दि. २७ रोजी बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा राज्याच्या महिला बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेण्यासाठी सकाळी ठीक ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथून त्यांच्या निवासस्थानी जायचे आहे. ज्यांना यायचे असेल त्यांनी युवा समिती सीमाभाग चे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांना संपर्क करावा असे आवाहन युवा समिती सिमाभागच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क – ९९४५३४६६४०