बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग संघटनेची कार्यकारिणी बैठक व पत्रकार परिषद गुरुवार, १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत संघटनेच्या पुढील ध्येय-धोरणांची आखणी, साधक-बाधक चर्चा आणि मागील पोलीस प्रशासनाच्या तुघलकी कारवाईसंबंधी माहिती व पुढील दिशा ठरविण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेकडून पत्रकार बंधूंना वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.