- महापौर मंगेश पवार , नगरसेवक जयंत जाधव यांना तात्पुरता दिलासा
बेंगळूर : बेळगावचे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या स्थगितीचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने २८ जुलैपर्यंत वाढवला. राज्य सरकारच्यावतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मागितला, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी खटल्याची सुनावणी तहकूब केली. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या वकील शंतनूगौडा आणि बेळगावचे ज्येष्ठ वकील रविराज पाटील यांनी बाजू मांडली.