बेळगाव / प्रतिनिधी
कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ११ यांगष्ट रोजी आयोजित केलेल्या महामोर्चात प्रचंड संख्येने सामील होणार असल्याचा निर्धार नेताजी भवन येथे घेण्यात आलेल्या जागृती सभेत येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते. निवृत्त शिक्षक कै. देवाप्पा (बंडू) यशवंत घाडी आणि म. ए. समितीचे कार्यकर्ते कै. गंगाधर बिर्जे यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री.प्रकाश अष्टेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात येळ्ळूर गावाने सीमालढ्यातील योगदानाबद्दल माहिती दिली आणि यापुढील काळात येळ्ळूर नेहमीच अग्रेसर राहील, असे सांगितले. यावेळी बेळगाव महापालिकेचे म. ए. समितीचे नगरसेवक श्री. रवि साळुंखे, श्री. शिवाजी मंडोळकर आणि सौ. वैशाली भातकांडे यांनी मराठी भाषेसंबंधी सभात्याग केल्यामुळे या शूर नगरसेवकांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी, नग सेवक श्री. राव साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि नगरसेविका सौ. वैशाली भातकांडे यांची समयोचित भाषणे झाली. या जागृती सभेस शिवाजी सायनेकर, उदय जाधव, चांगदेव परीट, गोविंद बापूसाहेब पाटील, प्रकाश पाटील अजित पाटील, प्रदीप देसाई, सतीश देसुरकर, रामा पाखरे, मिटू बेकवाडकर, प्रभाकर मंगनाईक, प्रवीण वालेकर, मह लोहार, गणेश अष्टेकर, शिवाजी पाटील, परशराम धामनेकर, सौ. सुवर्णा बिजगरकर, सौ. रुप्पा पुण्यानावर, सौ. वनिता परीट, हनमंत पाटील, नंदू पाटील, बाळू पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन युवानेते दत्ता उघाडे यांनी केले तर आभार श्री. राजू पावले यांनी मांडले.