बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर दाखल केलेल्या दोन खटल्यांची सुनावणी शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी बेळगाव न्यायालयात होणार आहे. समितीने सर्व कार्यकर्ते व नेत्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
- महामेळावा खटला क्रमांक 61/2020 :
दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेल्या या खटल्यात मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, सरिता पाटील, सरस्वती पाटील, गजानन दड्डीकर, रत्नप्रसाद पवार, दिगंबर पाटील, मदन बामणे, हनुमंत मजुकर, राजू बिर्जे, महेश जुवेकर, संजय शिंदे, रामचंद्र इरोजी पाटील, सुरज कणबरकर यांचा समावेश आहे.
- महामेळावा खटला क्रमांक 146/2022 :
चौथ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात शुभम शेळके, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, प्रकाश शिरोळकर, सचिन केळवेकर, सुनील बोकडे, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, श्रीकांत कदम, दिलीप बैलूरकर, बापू भडांगे, राजू चौगुले, बाबू कोले, राकेश पलंगे, शिवाजी सुंठकर, अनिल आंबरोळे, पियुष हावळ, सुरज कुडुचकर, दत्तात्रय उघाडे, मनोहर हलगेकर, मनोहर हुंदरे, सुरज कणबरकर, संतोष मंडलिक, धनंजय पाटील यांचा समावेश आहे.
सर्व कार्यकर्ते व नेते सकाळी 10.30 वाजता न्यायालयात हजर राहावेत, असे वकील महेश बिर्जे व समिती नेत्यांनी आवाहन केले आहे.








