बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत विविध संघटनात्मक आणि सीमाभागाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मध्यवर्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे. बैठकीत पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असून, या बैठकीकडे सीमाभागातील मराठी बांधवांचे लक्ष लागले आहे.








