- होनगा येथील आनंदाचे कुटुंबियांचे आदर्शवत कार्य
- ज्ञानदान, अन्नदान, गोदान ,सुवर्णदानाचा संकल्पही पूर्ण
बेळगाव : होनगा गावातील सर्वसाधारण कुटुंबीयातील आनंदाचे घराण्यातील रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीचे २०२० साली निधन झाले. त्यांचा पाचवा स्मृतिदिन असल्याने रामभाऊ आनंदाचे आणि त्यांच्या मुलांनी मिळून पहिल्या स्मृतिदिनावेळी संकल्प केला. त्यात ज्ञानदान, अन्नदान, गोदान सुवर्णदान, भूदान, असे पाच वेगवेगळ्या प्रकारचे दान देण्याचे ठरविले नुकतेच त्यांनी भूदान करण्याचे ठरविले असून याकरिता त्यांनी होनगा येथील गावात ५० लाख रुपये किंमतीची ७.२५ गुंठेजमीन मंदीरला दान स्वरूपात दिली आहे, अशी माहिती आनंदाचे कुटुंबीयांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२०१० मध्ये रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान झाले त्यानंतर २०२० पर्यंत त्यांनी आजाराशी झुंज दिली. त्यानंतर त्याचे निधन झाले. सुरुवातीच्या काळात एक वर्ष, महिना श्राद्ध आणि त्यानंतर वार्षिक श्राद्ध आनंदाचे कुटुंबीयांनी केले. आई-वडिलांच्या आशीर्वादानेच सर्व काही साध्य असल्याने त्यांनी ज्ञानदान अन्नदान, गोदान, सुवर्णदान करण्याचा संकल्प केला. आतापर्यंत त्यांचे चार दान पूर्ण होत आले आहेत तर येणाऱ्या पाच सहा महिन्यांमध्ये गोदान सुद्धा करणार यावेळी सांगण्यात आले.