बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) धारवाड विभागातर्फे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे आज शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

केएससीए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांच्या हस्ते आज मंगळवारी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे म्हैसूरी पगडी व शाल घालण्यासह विभागाचे शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अविनाश वैद्य, वीरण्णा सवदी, अल्ताफ कित्तूर, दयानंद शेट्टी, वसंत मुर्डेश्वर आदी उपस्थित होते.