बेळगाव : कृतीशील मराठा समाजाची बैठक आज बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी ५ वाजता बोलविण्यात आली आहे. मराठा समाजा समोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थेत उपलब्ध होण्याऱ्या संधी हे बैठकीचे प्रामुख्याने विषय असतील असे समन्वयक अमित देसाई यांनी कळविले आहे. या बैठकीला समाजातील जुन्या जाणत्या, तरुण होतकरू मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.