बेळगाव / प्रतिनिधी
येथील जय किसान या खासगी बाजाराने आपले व्यवहार थांबवल्यामुळे, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही शेतकरी मोठ्या संख्येने आपला शेतमाल घेऊन आल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली होती. बेळगावमधील जय किसान या खासगी बाजाराचा परवाना रद्द झाल्याने शेतकरी आपला शेतमाल बुधवारपासून बेळगाव एपीएमसीमध्ये आणत आहेत. आज, गुरुवारीदेखील विविध भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने आपला माल घेऊन एपीएमसीमध्ये आले होते. यावेळी व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला, असे दृश्य बाजारपेठेत दिसत होते.