बेळगाव : केएलई इंडिपेंडंट पीयू कॉलेजचा विद्यार्थी ध्रुव बद्री याने जेईई मुख्य परीक्षेत ९८.९९ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ध्रुवने सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव सराफ असोसिएशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष महांतेश कवटगीमठ तसेच प्राचार्य वेणूगोपाल रेड्डी यांनी ध्रुवचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला. महाविद्यालयाच्या वतीने त्याच्या यशाचा गौरव करण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.