- लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खासदार नीलेश लंके यांना सीमाप्रश्नी लोकसभेत आवाज उठवण्यात यावा, या संदर्भात निवेदन देण्यात आले. निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी सदर निवेदन दिले. यावेळी निलेश लंके यांनी मराठी भाषिकांच्या व्यथा लोकसभेत मांडणार असल्याचे आणि म. ए. समितीच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र पाठविले आहे.