- नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
होळीच्या उत्सवाला अनोखा आणि पर्यावरणपूरक रंग देण्यासाठी खासबाग येथे ‘फुलांची रंगपंचमी’ साजरी करण्यात येणार आहे. कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान, शहापूर यांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खासबाग (रिक्षा स्टँड समोर) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. फुलांच्या वर्षावातून रंगपंचमी साजरी करत आनंद आणि सौहार्दाचा संदेश देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमास समाजकार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केले आहे.








