• हालात्री नदीवरील पुलावर पाणी

खानापूर / प्रतिनिधी

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर- हेमाडगा – अनमोड मार्गावरील मणतुर्गानजीक असलेल्या, हालात्री नदी पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनधारक व प्रवासी पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर करीत आहेत.

परंतु खानापूर येथील रेल्वे स्थानकाजवळ असोगा रस्त्यावर रेल्वे मार्गाचे भुयारी काम सुरू आहे. त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूची माती ढासळत आहे. ताबडतोब यावर उपाययोजना केली पाहिजे अन्यथा हा मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.