बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी बंधू जय भवानी चौक, खडेबाझर बेळगावतर्फे गणेश मंडप मुहूर्तमेढ पूजन कार्यक्रम शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळचे अध्यक्ष विजय जाधव, बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव कार्याध्यक्ष सुनील जाधव यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मंडळाचे खजिनदार संतोष उरणकर यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
प्रारंभी सनई व ढोलताशांच्या गजरात खडेबाझर येथील अंबाई देवस्थान मंदिर येथील देवस्थान मंडळकडून विधिपूर्वक पूजन करून आरती करण्यात आली तेथून पारंपरिक पद्धतीने भटजीकडून गणेश मंडप खांब मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले.
एकंदरीत गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली असून व्यापारी बंधू खडेबाझर बेळगाव येथील मंडळांनी आपापल्या उपक्रमांना सुरुवात केली आहे. याप्रसंगी अमोल उरणकर, निलेश खटावकर, मंडळाचे सरचिटणीस नजराज काकती यांच्यासह खडेबाझर परिसरातील नागरिक, पंच ,महिला, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.