कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेने विद्यार्थ्यांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत श्रावणी शशिकांत गावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला.गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरांत या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.अध्यक्षस्थानी ह.भ.प.शिवाजी जाधव उपस्थित होते.
प्रारंभी शालेय विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. श्री ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांना सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देऊन वाय. पी. नाईक यांनी स्वागत केले याप्रसंगी बेळगुंदी मुलींच्या हायस्कूल मधील नूतन मुख्याध्यापक के.पी.बेळगावकर यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह सन्मान करण्यात आला.तसेच किशोर पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला
हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धेचे पहिले पाच विजेते : प्रथम क्रमांक – श्रावणी श.गावडे (इ.सहावी कावळेवाडी शाळा) , द्वितीय – स्वरा म. पाटील (इ.चौथी बालवीर बेळगुंदी) ,तृतीय क्रमांक – सानिका सु.बाचीकर (इ. नववी बिजगर्णी हायस्कूल), चौथा क्रमांक – आदित्य वि.देवाण (इ. ४ थी, बालवीर बेळगुंदी) , पाचवा क्रमांक – नम्रता ल. सुतार (इ. नववी, बिजगर्णी हायस्कूल) , उत्तेजनार्थ – वैभवी य. गावडे (इ. तिसरी कावळेवाडी) या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, भेटवस्तू, गौरव पत्र, देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी के. पी. बेळगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना, बालवयात वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. मोबाईल वापर कमी करावा.संत साहित्य श्रेष्ठ आहे.अभंग वाचनातून, श्रवण मनन चिंतन केल्यास एकाग्रता वाढते.अभ्यास करायला चैतन्य येते.महात्मा गांधी संस्थेने केलेला सन्मान हा उत्साह, प्रेरणा देणारा आहे , असे भावोत्कट विचार व्यक्त केले.
किशोर पाटील यांनी ही संस्था विधायक उपक्रम राबवत आहे विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यरत आहे हे अभिमानास्पद आहे असे मौलिक विचार मांडले. याप्रसंगी शिवाजी जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक, शिवाजी जाधव, एम.पी. मोरे, गौतम कणबरकर,चुडाप्पा यळुरकर, पांडुरंग मोरे, लक्ष्मण जाधव, ग्रामस्थ मंडळ, चेअरमन जोतिबा मोरे, विनय नाईक,सौ. वनश्री पाटील यांच्यसह शशिकांत गावडे, यल्लापा गावडे, सुनील बामणे, पुंडलिक मोरे, अशोक यळूरकर, विजयकुमार देवाण, मल्लापा मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत पंचवीस विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्वांना सहभागाची प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले
सूत्रसंचालन कोमल गावडे यांनी केले.आभार किशोर पाटील यांनी मानले.