बेळगाव : कर्नाटकातील मराठा समाजाला सध्या मिळणारे ‘३बी’ मधील आरक्षण बदलून ‘२ए’ प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावातील मराठा संघटनांनी तिरुपती येथे देवदर्शन घेत प्रार्थना केली.
याप्रसंगी मराठा समाजाचे नेते विनय कदम यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बेळगावातील शेकडो कार्यकर्ते पायी चालत आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरूमला देवस्थान येथे पोहोचले.
यावेळी बेळगाव तालुका मराठा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, श्री वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष परशराम तुप्पट, आर.आर. चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक दर्शन घेऊन कर्नाटकातील मराठा समाजाला ‘२ए’ प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी साकडे घातले.
