बेंगळूर : शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी व दहावी २०२५-२६ वार्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावी परीक्षा २८ फेब्रुवारी तर दहावी परीक्षा १८ मार्चपासून सुरु होणार आहे. कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने बुधवारी दि. ५ वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. बारावी परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत परीक्षा होणार आहे. तर दहावी परीक्षा १८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत होणार आहे. या परीक्षेसाठी सकाळी १० ते दुपारी १.१५ अशी वेळ असेल. बारावी परीक्षा-२ २५ एप्रिल ते ९ मे पर्यंत होणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोपे होणार आहे.
January 24, 2026
अथणी / वार्ताहर दुचाकीवरील ताबा सुटून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील दुरूर गावाजवळ घडली. श्रीशैल हवालदार (वय ५०, रा. तीर्थ […]








