• बेळगावात मराठा समाजाची जनजागृती बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये २२ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या जातिनिहाय जनगणनेत मराठा समाजाने एकत्रितपणे आपली नोंद “जात – मराठा, उपजात – कुणबी, मातृभाषा – मराठी” अशी करणे आवश्यक आहे, यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच अनुषंगाने बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली पै रिसॉर्ट येथे महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश देसाई, रमेश गोरल, मोहन मोरे, राज्य मराठा समाज संयोजक विनय विलास कदम, भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव, सध्याचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, तसेच मराठा नेते शरद पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील, खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील आणि संघटनेचे चिटणीस मारुती चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध नेत्यांनी आपली मते मांडली तर विधान परिषद सदस्य आणि मराठा समाजाचे नेते मारुतीराव मुळे यांनी मार्गदर्शन केले.