- येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार : बैठकीत विविध विषयांवर चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
सीमाभागात मराठीला डावलून कन्नडसक्ती अधिक तीव्र केली जात आहे. या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या महामोर्चात येळ्ळूर गावातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चाला बळ देतील, असा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीने केला. सोमवारी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक अध्यक्ष विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
प्रारंभी बेळगाव महानगरपालिकेत मराठीसाठी आवाज उठविलेल्या नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्ष सतेश पाटील, कार्याध्यक्ष भुजंग पाटील, सचिव राजू उघाडे, लक्ष्मण छत्रण्णावर, मूर्तीकुमार माने, आनंद पाटील, उपाध्यक्ष पाटील, शिवाजी नांदूरकर, परशराम परीट यांसह मोठ्या संख्येने म. ए. समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.