- विजेत्याला रोख रु.५११११ /- हजार तर उपविजेत्याला रु.२५,५५५/- मिळणार
कंग्राळी खुर्द : येथील मराठा साम्राज्य स्पोर्ट क्लब च्या वतिने ग्रामदैवत श्री मसणाई देवी यात्रेनिमित भव्य हाफपीच कै. बी आय पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धांचे २ डिसेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु.५११११ /- व चषक तर उपविजेत्या संघाला रोख रु.२५,५५५/- व चषक मिळणार आहे.
गेली २० वर्षे होत असलेल्या या स्पर्धा मराठी शाळेच्या आवारात डे नाईट होणार असून मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे . या स्पर्धेच्या मुख्य बक्षिसा व्यतिरीक्त मालीकाविराला चांदीची चेन व लॉकेट व चषक, उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाजाला चांदीचे नाणे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे . सामने ५ षटकाचे होणार असून इच्छूक संघानी ३० नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी मराठा साम्राज्य स्पोर्टस क्लब कडे करावयाची आहेत अधिक माहितीसाठी, पुंडलिक पाटील – ८८६७५०१६७५ , विनायक तम्माण्णाचे – ८०८८०८२०१० , अजित पाटील – ९०१९४३५३१८ यांच्याशी संपर्क साधावा.









