-
सर्वोच्च न्यायालयाचा विजयपूर जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा
विजयपूर / वार्ताहर
कणेरी श्रींवरील विजयपूर जिल्ह्यातील प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही मंजूर केला आहे, त्यामुळे कणेरी श्रींना आणखी एक झटका बसला आहे.
विजयपूर जिल्हा प्रशासनाने १६ ऑक्टोबरपासून १४ डिसेंबरपर्यंत, म्हणजेच दोन महिन्यांच्या कालावधीसाठी, बीएनएस कायद्याच्या कलम १६३(३) अंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून कणेरी श्रींना जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली होती.
या आदेशाविरोधात कणेरी श्रींच्या वकिलांनी प्रथम कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र उच्च न्यायालयानेही प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, परंतु तेथेही विजयपूर प्रशासनाच्या भूमिकेला न्यायालयाने मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल अबाधित ठेवत कणेरी श्रींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेशावर असलेली बंदी कायम ठेवली आहे.
या निर्णयामुळे विजयपूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अधिक बळकट ठरला असून, कणेरी श्रींना सध्या विजयपूर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.








