• बोलेरो – ट्रकच्या धडकेत चौघे जखमी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावकडे जाणाऱ्या काकती महामार्गावर मालवाहू ट्रक आणि मालवाहू बोलेरो वाहनाचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरोला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या दुर्घटनेत चौघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जखमींची नावे बिजय, मोमीन, बजरंगी आणि सशमणी अशी आहेत. गंभीर जखमीला रुग्णालयात नेताना तो बेशुद्ध अवस्थेत होता.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, दर्शन होळबट्टे, संतोष दरेकर, पद्मप्रसाद हूळी आणि राजू टक्केकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बेळगाव येथील बीआयएमएस रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचारासाठी दाखल केले.

अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.