बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती सेंट्रल स्कूलमधील दोन विद्यार्थिनींनी स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तसेच ‘यू.एस.ए. बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

शाळेतील इयत्ता सहावीची लावण्या भंडारी व इयत्ता तिसरीची मनस्वी भंडारी यांनी गोगटे सर्कल येथील रोटरी क्लब परिसरात सलग १ तास २६ मिनिटे २६ सेकंद स्केटिंग करत हा विक्रम साकारला. या प्रेरणादायी यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या सोनाली कंग्राळकर यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या कामगिरीमुळे शाळा व शिक्षण संस्थेच्या नावात भर पडली असून, सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.