बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगीतकलेत आपले कौशल्य दाखवून दिले. भारत विकास परिषद बेळगांव यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये लोकगीत गायन स्पर्धेत ज्योती सेंट्रल शाळेच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.यासाठी शालेय संगीत शिक्षिका श्रीमती अक्षता मोरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. याबद्दल शालेय एस्.एम्.सी कमिटी तसेच मुख्याध्यापिका श्रीमती. सोनाली कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मिळविलेल्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. यामध्ये एकूण २२ शाळांनी सहभाग घेतला होता.